धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत १०४ आदिवासी गावांचे होणार पुर्ण सर्वेक्षण जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने होणार नियोजन.
बातमी संकलन:- हेमू वालदे

धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत १०४ आदिवासी गावांचे होणार पुर्ण सर्वेक्षण
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने होणार नियोजन.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना अंर्तगत गोंदिया जिल्ह्यातील १०४ आदिवासी बहुल गावांची निवड केंद्र सरकारने केली असुन आदिवासी समुदायासाठी विविध सोयी सुविधा शिबिराच्या माध्यमातुन उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत व यामध्ये प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील लाभ मिळालेल्या तालुकानिहाय गावांची संख्या
देवरी – ४९
अर्जुनी/मो. – १५
सालेकसा – 15
सडक अर्जुनी – 11
गोरेगांव – 5
गोंदिया – ४
तिरोडा – ३
आमगाव – २
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंर्तगत दि.१५ जुन ते ३० जुन पर्यंत आदिवासी गावांमध्ये महसूल विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, कृषी विभागा मार्फत शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये विविध दाखले आणि इतर सर्व योजनांचा आदिवासी समुदायातील लोकांना लाभ देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त या १०४ गावांमधील आदिवासी समुदायाच्या लोकांना वैयक्तिक व ग्रामस्तरावरील भौतिक सोयीसुविधांची माहिती एकत्रित करण्याच्या अनुषंगाने या गावांचे एकत्रित सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतस्तरावर कार्यरत असलेले संगणक परिचालक / योजनादूत यांच्यामार्फत प्रकल्प कार्यालयाकडून आवश्यक मानधन अदा करुन या गावातील वैयक्तिक जशे की, कुटूंबातील सदस्य संख्या त्यांच्याकडे असणारे वैयक्तिक दाखले, आधार कार्ड , जातीचे दाखले, राशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना , कृषी सन्मान योजना, वनपट्ट मिळाला आहे किंवा कसे त्यांचबरोबर इतर काही घरकुल योजना किंवा इतर काही वैयक्तिक लाभाच्या योजना अश्या सर्व बाबींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आदिवासी बहुल गावांमध्ये काही सोयीसुविधाची आवश्यकता आहे का ? त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र, पाणी पुरवठा, शाळा, रस्ते, इतर आवश्यक बाबी जसे की समाज भवन, महिला बचत गटांसाठी सोयीसुविधा या बाबींचे सर्वेक्षण केले जाणार आहे . या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे जिल्हास्तरावरील १०४ आदिवासी बहुल गावांमध्ये विकासात्मक कामे व लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना पोहचविण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील आदिवासी बहुल १०४ गावांच्या सर्वेक्षणातून आवश्यक त्या सोयी-सुविधा संबंधित गावापर्यंत पोहचविण्यास मदत होईल – उमेश काशिद, प्रकल्प अधिकारी, देवरी
या अनुषंगाने दि. २६/०६/२०२५ रोजी जिल्ह्यातील विविध तालुका समन्वयक, योजनादूत व संगणक परिचालक यांचे प्रशिक्षण प्रकल्प कार्यालय देवरी येथे आयोजित करण्यात आलेले होते. या प्रशिक्षणा दरम्यान प्रकल्प कार्यालया मार्फत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या सर्वेक्षनासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद यंत्रणेचे सहकार्य मिळणार आहे .