धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान शिबिर खासदार, मा.डॉ.नामदेवराव किरसान याच्या उपस्थित पालांदूर/जमी येथे आयोजन
बातमी संकलन:- हेमू वालदे

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत गोंदिया जिल्हयातील 104 आदिवासी गावांमध्ये 15 जून ते 30 जून 2025 दरम्यान विशेष जनजागृती मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 24.06.2025 रोजी शासकिय आश्रमशाळा पालांदू/जमी येथे धरती आबा जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.डॉ.नामदेव किरसान खासदार, गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र, श्री.उमेश काशिद प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, सौ.जयवंता ताई हरदुले सरपंच,श्री.कलींद गुरुनुले उपसरपंच,श्री.पिहिदे सामाजिक कार्यक्रर्ता, श्री.संतोष जी.करचाल अध्यक्ष,शा.व्या.समिती, श्री.नुरचंद नाईक उपसंरपंच, श्री.राजकुमार नाईक,सदस्य, ग्राम.पंचायत, श्री.देवविलास भोगारे माजी संरपंच ग्राम.प.मगरडोह, श्री.आर.एम.मासरकर मुख्याध्यापक, श्री.प्रेमचंद गुप्ता माजी सरपंच, श्री.महेद्र निकाडे,सामाजिक कार्यक्रर्ता,इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातील मा.डॉ.नामदेव किरसान खासदार साहेब यांचे हस्ते क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना श्री.उमेश काशिद ए.आ.वि.प्रकल्प कार्यालय देवरी यांनी प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) च्या धरतीवर धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची दिनांक :- 2 आक्टोबर 2024 रोजी सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेत अंमलबजावणीसाठी 25 प्राधान्य क्षेत्रे व 17 मंत्रालये निश्चित करण्यात आली असुन याव्दारे आदिवासी जमातीच्या सामाजिक आर्थिक विकास साध्य करण्याचे उद्दीष्टे आहे. (PM-JANMAN) च्या धर्तीवर (DA-JGUA) या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान गोंदिया जिल्हयातील 104 आदिवासी गावांमध्ये 15 जून ते 30 जून 2025 दरम्यान राबविण्यात येत असल्याबाबतची माहिती दिली. त्यापैकी देवरी तालुक्यातील 49 गावांची निवड झालेली असुन आदिवासी समाजातील सर्व घटकांनी एकाच छताखाली एकाच वेळी सर्व आवश्यक कागदपत्रे व योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असुन तेव्हा आपण सर्वांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शिबिरादरम्यान श्री. देवेंद्र दाजीबा शेंडे, श्री. प्रेमचंद बळीराम महाले, श्री. दाजीबा महादेव शेंडे, श्री. राजेश प्रेमचंद महाले, श्री. वनराज श्रिराम ताराम, श्री. हरिचंद मथरु पदे, श्री. भैय्यालाल रामदास काटेंगे, इ.कमी कालावधीत घरकुल बांधकाम पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांना घराच्या चाव्या व जॉब कार्ड,वनहक्क पटटे, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते सोपविण्यात आल्या.
शिबिर कार्यक्रमात अध्यक्षीय भाषनात मा.डॉ.नामदेव किरसान खासदार, गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र,यांनी उपस्थित लाभार्थींनी आयोजित करण्यात आलेल्या शिबीराच्या माध्यमातून ग्रामीण जनतेने या शिबिराच्या माध्यमातून जे आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेण्याचे आवाहन केले तसेच नवयुवक विद्यार्थ्यांनी सुध्दा आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन शिक्षणाच्या माध्यमातून आपला परिवार सह समाजाला समोर नेण्याचे आवाहन केले.
शासकीय आश्रमशाळा पालांदूर/जमी ता.देवरी येथे आयोजित शिबिरामध्ये सकाळी 10.00 ते 5.00 च्या दरम्यान एकुण 07 कार्यालयांनी लावण्यात आलेल्या स्टॉल च्या माध्यमातून शिबिरामध्ये 176 ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून त्यामध्ये मतदार ओळखपत्र, आधार कार्ड,रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र,जॉब कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड,पीएम-किसान,जनधन खाते,अटल पेंशन योजना,पीएम सुरक्षा योजना,ई-श्रम कार्ड अशा अनेक दाखले लाभार्थींना लाभ प्राप्त झाला आहे.
यावेळी तहसिल कार्यालय देवरी येथील अधिकारी/कर्मचारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.एस.आर.झाडे प्रा.शिक्षक व उपस्थित मान्यवराचे आभार श्री.पी.पी.कोरोंडे प्रा.शिक्षक यांनी केले.