दल्ली येथील महिलांची रंगीत संगीत शेती शाळा बनली महिलांसाठी वरदान :- कृषी सहायक राजशेखर राणे
बातमी संकलन:- हेमू वालदे

दल्ली ता.सडक/अर्जुनी जि. गोंदिया :- दिनांक २४ जून 2025 :- तालुक्यातील ग्राम दल्ली /ख अंतर्गत येणाऱ्या कृषि सहायक कार्यालय मार्फत महिलांची रंगीत संगीत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले .
कृषि विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शेतीशाळेचे आयोजन करण्यात येते. शेती शाळेमध्ये 30 शेतकऱ्यांची निवड करून शेतीशाळा राबवली जाते. त्या शेती शाळेमध्ये माती परीक्षण, बीज प्रक्रिया, बियाणे पेरणी, पिकांमधील आंतर मशागत,रोग व किडी ची ओळख , मित्र कीड व शत्रू कीड यांची ओळख पीक संरक्षण व तसेच पिकाची कापणी व साठवणूक या सर्व बाबींवर तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सहाय्यक कृषि अधिकारी राजशेखर राणे यांनी विशेष महिलांची रंगीत संगीत शेती शाळा राबवण्याचे ठरवले. त्यामध्ये 30 महिलांची निवड करून दोन गटांमध्ये पंधरा-पंधरा महिलांची विभागणी करून महिलांचे हिरवा व लाल असे दोन गट शेती शाळेसाठी निवडण्यात आले. त्यामध्ये महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दाखवला व शेती शाळेचा दुसरा वर्ग यशस्वी राबवला. या शेती शाळेमध्ये प्रत्यक्ष सहाय्यक कृषि अधिकारी राजशेखर राणे यांनी सुद्धा महिला शेतकरी यांच्या सह शेतावर भात बियाणे गादीवाफा पद्धतीने लागवड प्रात्यक्षिकात भाग घेतला . सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक कृषि अधिकारी राजशेखर राणे यांनी महिला शेतकर्यांना शाळेतील विद्यार्थी असल्याचा अनुभव प्राप्त होण्यासाठी , महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शाळेचा गणवेश सर्व महिलांसाठी तयार करून घेतला. महिला शेतकर्यांचे शेती शाळेत मनोरंजन होण्यासाठी पासिंग बॉल हा सांघिक खेळ सुधा खेळला व विजयी महिला शेतकर्यांना बक्षीस वितरण करण्यात आले . या प्रसंगी उप कृषि अधिकारी रजनीश पंचभाई ग्राम विस्तार अधिकारी श्री . पटणे शेतकरी ऑनलाईन मार्गदर्शन केंद्र बाम्हणी चे संचालक शुभम मेश्राम, अमरावती शेती शाळेचे विद्यार्थी ईशान खेडकर , सरपंच रेखाताई परतेकी , शालू परतेकी ,हेमलता मंडारी, गीता करचाल ,विद्या चनाप ,सत्यभामा चनाप, शालिनी राऊत ,मीना राऊत, उर्मिला राऊत, गायत्री चौधरी, ममता चनाप ,भाग्यवंता उईके , पुष्पा भोयर, उषा करचाल, भाग्यश्री हत्तीमारे, वनिता ठलाल, सविता ठलाल ,ललिता नाईक, नीता राऊत ममता राऊत ,येशु राऊत, गंगेश्वरी नाईक, दिपाली कुरसुंगे, लक्ष्मि उईके, उषा नाईक, वैशाली मडावी, वनिता मडावी ,नेहा लोखंडे ,मनीषा कुरसाम, शांता धुर्वे मंजुळा मलये , रिता कुसराम, प्रियंका मंडारी, कमला मडावी, संगीता मडावी, कल्पना मंडारी, हरशीला भोयर सरिता कोडापे , आशा मडावी ,उषा उईके, महिलांनी सहभाग नोंदवला सरपंच रेखाताई परतेकी व दोन्ही महिला शेतकरी गटप्रमुख यांनी उपस्थित शेतकर्यांचे गावकऱ्यांचे कर्मचारी अधिकरी यांचे आभार मानून शेती शाळेच्या पहिल्या वर्गाची सांगता केली .