साकोली तालुका हादरलं:डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन रुग्णीशी केले अश्लील चाळे..!
बातमी संकलन:- हेमू वालदे

साकोली = शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना दि. ९ जुलैला उघडकीस आली आहे.देवेश अग्रवाल असे डॉक्टरचे नाव असून,सदर मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती.डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास अश्लील चाळे केल्याचा असा गंभीर आरोप आहे.
घडलेली घटना पीडितेने आई-वडिलांना सांगितल्यानंतर साकोली पोलिसांनी या प्रकरणी १० जुलैला गुन्हा दाखल करून डॉ.देवेश अग्रवाल (वय अंदाजे ४५ वर्ष,रा.सौंदड) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉक्टर अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.मात्र साकोली शहरात या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे.
घटनेचा निषेध करत मा: जिल्हा प्रमुख शिवसेना युवासेना चे महेश भाऊ डुंभारे यांनी प्रशासनाला इशारा देण्यात आला की 7 दिवस लोटून ही आरोपी डॉक्टर ला एरेस्ट करण्यात आलं नाही 2 दिवसाच्या आता डॉक्टर ला एरेस्ट करा.2 दिवसाच्या आत डॉक्टर ला एरेस्ट न केल्यास शिवसेना युवा सेना च्या स्टाईल ने दवाखान्याला ताला ठोकू असा इशारा देण्यात आला आहे